ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ..; विजय वडेट्टीवारांचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही असा थेट इशारा काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारलाच दिला आहे. ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

एसीबीसी तून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. परंतु काही विघ्नसंतोषी त्याला वेगळे वळण देण्यासाठी काम करत आहेत असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात रविवारी सकाळी ओबीसी मोर्चात सहभागी नोंदवला. त्यावेळी ते बोलत होते.

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडे अकरा वाजता भव्य मोर्चाला सुरूवात झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ओबीसी समाजातील नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला आहे. मोर्चामध्ये ढोलताशा पथके आणि विविध वाद्य परंपरागत नृत्य आणि गीते सादर केली जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like