चंद्रकांत पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र ; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत. ते नेहमीच भ्रमण करत असतात. त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबतात,” अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय गोटात चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या. पाटलांच्या याच वक्तव्यावर बोलताना “चंपारण्यात एक पात्र आहे. हे पात्र नेहमी भ्रमण करतं त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबत आणि गैरसोय झाली की हे पात्र बदलतं. या पात्रामध्ये चंद्रकांत पाटील असावेत,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी पाटलांवर खोचक टीका केली.

तुम्हाला बोलवलंच नव्हतं – अजित पवार

एकजण म्हणतो मी परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??” चंद्रकांत पाटलांना कोणी बोलवलंच नव्हतं. उलट ते आल्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला आहे असं अजित पवार म्हणाले. कोथरुडकरांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलंय. उद्या जर कोथरुडकर काही काम घेऊन गेले तर मी परत जाणार आहे, असं चंद्रकांतदादा सांगणार आहेत का?”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

नक्की काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील –

पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment