हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यपदावर माझी माझी तीन वर्षांसाठी 18 फेब्रुवारी 2019 रोजी नियुक्ती झाली होती. या पदाचा मी स्वतःहून राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारून मला कार्यमुक्त करावे अशी विनंती विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे. त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा आणि 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नेमणूक करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. हा आदेश कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याने रहाटकर यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं.मात्र आज विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.