व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सीबीआयचा अजून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात आरोप निश्‍चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्‍य नाहीत आणि आरोपीविरोधात नव्याने साक्षीपुरावे सापडणे आणि नवे आरोप लागणेही शक्‍य नसल्याचा युक्तिवाद बचावपक्षाकडून करण्यात आला.

बचाव पक्षाचा हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपी विक्रम भावेला सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपी विक्रम भावे हा मागच्या दोन वर्षांपासून सीबीआयच्या ताब्यात होते. विक्रम भावे याने 2013 मध्ये डॉ. दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या केली होती.

या प्रकरणी सीबीआयने आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना घटनास्थळाची रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी विक्रम भावेने मदत केल्याचा आरोप तपासयंत्रणेकडून करण्यात आला आहे.