स्व. विलासकाकांचा सुपने विभाग विकासकामांमुळे माझ्या पाठीशी : शंभूराज देसाई

कराड | मी तुमच्या मतदार संघाचा आमदार आहे. मला कोणी किती मते दिली, यांचा मी कधी विचार केला नाही. गावा- गावातील प्रश्न सोडविण्याचं काम करत आलो आहे. गेल्या सात वर्षात चांगले काम करत असल्याने मंत्रीपद ही तुम्हा जनतेच्या आशिर्वादाने मिळाले. त्यामुळे पाटण मतदार संघातील प्रत्येक गावाचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी आहे. स्व. विलासकाकांच्या विचाराचा असलेला सुपने विभाग विकासकामांमुळे माझ्याही पाठीशी राहिला असल्याचे पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

तांबवे (ता. कराड) येथे बौध्द वस्ती (अशोकनगर) कोयना नदीकाठी पूरसंरक्षक भिंत व घाटाचे कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई बोलत होते. यावेली जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, काॅंग्रेसचे युवा नेते सतिश पाटील, सुपने गावचे सरपंच अशोक झिब्रे, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा वाडते आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील म्हणाले, कराडमधून पाटण मतदार संघात आमचा सुपने जिल्हा परिषद गट गेल्यानंतर लोकांना वनवासात गेलो असे वाटत होते. 2009 ते 2014 या काळात खरोखर आम्हांला वनवास भोगावा लागला. कारण आमचे लोकनेते स्व. विलासकाका यांनी आम्हांला विकासकामांचे झुकते माप दिले होते. 2014 साली जेव्हा शंभूराज देसाई साहेब हे आमदार झाले अन् आम्हांला पुन्हा एकदा वनवासातून आमच्या लोकनेत्याचा वारसा चालविणारा नेता मिळाला. आज कोट्यावधी रूपयांची कामे आमच्या गटात आ. शंभूराज देसाई यांनी दिल्यानेच सर्व भाग पाठीशी उभा राहिला आहे. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सतिश यादव यांनी केले. आभार उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी मानले.