गावठी 10 तरुण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला; पाटण तालुक्यात नरेंद्र पाटीलांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल स्थगिती उठत नाही आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाटण तालुक्यातील मराठा तरुण मुले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत, प्रत्येक गावातील कमीत कमी 10 तरुण किंवा त्यापेक्षा जास्त तरुण त्याठिकाणी उपोषणाला 10 तारखे पासून सुरुवात करणार आहेत. अस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जी मशाल येते ती मशाल देखील त्या आंदोलनाच्या ठिकाणी येईल आणि मग आपल्या आपल्या गावी जाईल अस नरेंद्र पाटील म्हणाले. जर पाटण तालुक्यातील डोंगर कपारी भागातील तरुण वर्ग असा निर्णय घेऊ शकतो तर तुम्ही देखील आंदोलन करायला सुरुवात करा अस आवाहन देखील त्यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना केलं.

दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व मराठा आमदारांची बैठक नवी मुंबई येथे घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सर्व मराठा आमदारांशी माझं बोलणं झालं असून लवकरच बैठकीची तारीख सांगण्यात येईल असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like