त्या आवाजाचं ‘गुढ’ वाढलं, उस्मानाबादमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | मागील 15 ते 20 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा या तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला येतोय. 1993 च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तालुक्यांमध्ये या आवजाने भीतीच वातावरण पसरलं आहे.

काल ही असाच आवाज लोहारा आणि तुळजापूर परिसरात ऐकायला मिळाला. त्यामुळे परिसरातील लहान मुलं आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जमिनी हादरल्या, मोठा आवाज झाला,
पतरे हलले आणि घरातील भांडे या हादऱ्याने पडले असं इकडचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

परिसरातील जुनी-जाणती लोकं तर 1993 चा तो भयावह प्रसंग बोलताना सांगतायत की आम्ही जे दिवस पहिले ते पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळू नये. अधिकारी समोर येऊन बोलायला टाळाटाळ करत आहेत अशी तक्रारही गावकरी करत आहेत. भूकंपा सारखा कांही प्रकारच घडला नाही असं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. मात्र गावकऱ्यांची अवस्था पाहता
प्रशासनाकडून वेळीच योग्य पावलं उचलली गेली तर
संभाव्य धोका टाळला जाऊ शकतो.

पहा व्हिडिओ रिपोर्ट

त्या आवाजाचं 'गुढ' वाढलं, उस्मानाबादमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Comment