Thursday, February 2, 2023

समृद्धी बोगद्याच्या कामामुळे ग्रामस्थ त्रस्त; 1 भिंत कोसळली, 9 घरांना तडे

- Advertisement -

औरंगाबाद | सावंगी (हर्सूल) गावाजवळ असलेल्या कोलठाण या ठिकाणी होत असलेल्या समृद्धी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी जिलेटिनच्या काड्यांनी ब्लास्टिंग करण्यात आली. या ब्लास्टिंगमुळे एका घराची भिंत कोसळली असून 9 घरांना तडे पडले आहेत. याबाबत त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी तक्रार केली परंतु एक महिना उलटला तरीही एमएसआरडीसीने तपास सुद्धा केलेला नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील 112 किलोमीटर लांबीचा ‘सुपरफास्ट एक्सप्रेस वे’ म्हणजेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. लॉकडाऊनमुळे चौदा महिन्यापासून या रस्त्याचे काम खोळबले होते. कोलठाणा या गावातून हा मार्ग जात असून या गावाच्या पश्चिमेला डोंगर फोडून तर पूर्वेला असलेल्या डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे दोन डोंगर फोडण्यासाठी कंत्राटदार कंपनीने जिलेटिनच्या काड्यांचे स्फोट घडवले 30 मे रोजी पश्चिमेकडील असलेल्या डोंगराला स्फोट घडवून आणला त्याचवेळी गावातील घरांना जोरदार हादरे बसले. आणि यागावात असलेल्या संतोष जगदाळे यांच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली.

- Advertisement -

ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी ग्रामस्थांनी एमएसआरडीसीकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. त्यानंतर अधिकारी कर्मचारी येऊन पाहणी करतील, कंत्राटदार कंपनीला जिलेटिनच्या वापराबाबत काही निर्देश देतील. अशी अपेक्षा होती. परंतु आता तक्रार करूनही महिना झाला आहे. तरीही एमएसआरडीसीने या गावात पाय ठेवलेला नाही. तसेच सुखदेव दौंड, कचरू भालेराव, धोंडीराम भालेराव, प्रभाकर श्री सुंदर, भानुदास अधाने, मनोज जनार्दन जगदाळे यांच्या घरांना तडे गेले आहे. 30 मे रोजी ब्लास्टिंग वेळी घरांना तडे गेल्यानंतरही दोन्ही डोंगरांमध्ये ब्लास्टिंग सुरूच आहे. यामुळे या ठिकाणी राहणारे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.