पुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारा Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा (villagers taken dead body from the flood river) काढावी लागली आहे. एकीकडे आपला देश प्रगती करत आहे तर दुसरीकडे काही खेडेगावांमध्ये असे भयानक वास्तव पाहायला मिळत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील हे विदारक दृश्य (villagers taken dead body from the flood river) आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. मात्र राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला (villagers taken dead body from the flood river) होता. या नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.

हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून या पुलासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी (villagers taken dead body from the flood river) केली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. आता मृतदेह पाण्यात घेऊन जाण्याची वेळ आली, त्यामुळे आतातरी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?