काय आहे विमा सखी योजना? महिलांना मिळणार 2 लाखांहून अधिक मानधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधानांनी विमा सखी योजना लाँच केली आहे. विमा सखी असणाऱ्या महिला आपल्या भागात राहणाऱ्या इतर महिलांना विमा पॉलिसी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याचसोबत त्यांना मदत करणे, अशी कामे सोपवण्यात आली आहेत. याआधी त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच त्यांना दोन लाखांहून अधिक मानधन दिले जाणार आहे. तर चला आता सुरु झालेल्या या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विमा सखी योजना

विमा सखी योजना हि LIC द्वारा राबविण्यात येणारी योजना आहे. यामध्ये इच्छुक महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांना विम्याचे महत्त्व समजावून सांगण्याची आणि वित्तीय समज वाढवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे . या प्रशिक्षणात सहभागी महिलांना पगार मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. तसेच बीए डिग्रीधारक महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधीही उपलब्ध होईल.

फक्त महिलाच अर्ज करू शकतात

या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या महिला दहावी पास असणे आवश्यक आहे . या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहे. या महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्त केले जाईल. पण एलआयसीच्या नियमित कर्मचाऱ्यांसारखे लाभ त्यांना मिळणार नाहीत. तसेच विमा सखी महिलांना त्यांचे कार्य प्रदर्शन प्रत्येक वर्षी दाखवावे लागेल.

प्रशिक्षण तसेच पगार

या योजनेतील महिलांना तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत दोन लाखांहून अधिक मानधन मिळेल. यामध्ये पहिल्या वर्षी सात हजार, दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मानधन मिळेल. तसेच यामध्ये बोनस किंवा कमिशन समाविष्ट नाही. महिलांना विकलेल्या पॉलिसीच्या 65% पॉलिसी पुढील वर्षी पर्यंत चालू असाव्या लागतील , हि अट ठेवण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

विमा सखी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अर्ज करण्यासाठी, प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा https://licindia.in/test2 या लिंकवर क्लिक करा. यानंतर Click here for Bima Sakhi या पर्यायावर क्लिक करा. नंतर आपले नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता यांसारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यासोबतच एलआयसी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधित माहिती देखील देणे आवश्यक आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर, अर्ज सबमिट करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला जातो.