सहमतीचे राजकारण करताना अटलजींना गांधीवादी समाजवाद वास्तवात आणता आला नाही – विनय हर्डीकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | सागर रौंदळ

‘अटलजींमध्ये राष्ट्रीय जाणीव प्रचंड होती. राजकीय कार्यकर्ता आणि नेता या दोन्ही भूमिका सांभाळणे अवघड असते. मात्र त्यांनी त्या दोन्ही भूमिका सांभाळल्या. प्रशासक आणि संयोजक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र सहमतीचे राजकारण करताना अटलजींना गांधीवादी समाजवाद वास्तवात आणता आला नाही’ असे मत जेष्ठ पत्रकार व लेखक विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. लोकशाही जागर मंचाच्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “अटलजी व सहमतीचे राजकारण” या विषयावर ते बोलत होते.

“लोकशाहीत दुसऱ्याचं ऐकण्याची तयारी पाहिजे, त्यामधून काहीतरी सकारात्मक नक्की घडते हा विश्वास जोपासणारे अटल बिहारी वाजपेयी होते.” अशा शब्दात हर्डीकर यांनी अटलजींबद्दल गुणगाण गायले. ‘आज अटलजींइतका सर्वसमावेशकपणा राजकीय नेत्यांमध्ये आढळत नसल्याची खंतही यावेळी हर्डीकर यांनी व्यक्त केली. अटलजींच्या भाषणात मार्मिकता व चातुर्य हे गुण होते. याचा दाखला देत, ‘अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले की मी स्वयंसेवक आहे. तेव्हा डावे आणि काँग्रेसवाल्यांनी संघाचे ते स्वयंसेवक आहेत अशी टीका केली. तेव्हा त्याला उत्तर देताना अटलजींनी मी मातृभूमीचा स्वयंसेवक आहे अशी चपराक लगावल्याची आठवण हर्डीकर यांनी सांगितली.

‘पाच राज्यांतील मतदारांनी व्यवहारचातुर्य दाखवत भाजपला धडा शिकवला. भाजपला आलेली सूज आता उतरली आहे’ असे म्हणत हर्डीकर यांनी छत्तीसगड, म.प्रदेश, राजस्थान येथे भाजपला पत्कराव्या लागलेल्या पराभवावर भाष्य केले. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीबद्दल बोलताना ‘विकासाचे राजकारण की राम मंदिर? हे भाजपला ठरवावे लागेल’ असंहीे ते म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसने सुरु केलेल्या सरंजामशाही पद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले. आर्थिक उद्दिष्टांची पूर्ती हा घटक महत्त्वाचा असल्याने त्याचेही नियोजन केले पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नॅशनल शिपींग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित होतेे. यावेळी मयूर कर्जतकर यांनी अटलजींच्या कवितांचे वाचन यांनी केले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment