निष्क्रिय अशोक चव्हाणांकडून मराठा आरक्षणाची जबाबदारी काढून घ्या ; विनायक मेटेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करुन आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढायला हवी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. यावरून आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी हल्लाबोल केला आहे. “अशोक चव्हाण हे असून त्यांच्याकडील मराठा आरक्षणाची जबाबदारी काडून घ्यावी, अशी मागणी मेटे यांनी यावेळी केली.

विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हंटले आहे की, मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. ते निष्क्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घ्यावी. तसेच राज्य सरकारने आयोगाची पुनर्रचना करावी. जर या संदर्भात 8 दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक न घेतल्यास 13 रोजी मुंबईत राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन करु, असा इशारा मेटे यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघादीवर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. भाजपमधील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्याकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 102 व्या घटनादुरुस्तीत बदलाबाबत दिलेल्या निर्णयावरून आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

Leave a Comment