“राणेंकडून ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी करून धमकीचा प्रयत्न”; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. राणेंची आजची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड, निकाला कचरा, अशी झाली आहे. राणेंनी स्वाभिमान घाण ठेऊन लाचारी पत्करली आहे. राणेंकडून केवळ भाजपच्या गुडबुडबुकमध्ये राहण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. माझ्या नावाचा वापर करून राणेंनी काल ट्विट केले आहे. त्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे, अशी टीकाही यावेळी राऊतांनी केली.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत महापौर किशोरीताई पेडणेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. “केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल एक ट्विट केले. राणेंनी ज्या बडेजाव पद्धतीने जी गोधना केली होती ट्विटच्या माध्यमातून त्याकडे पाहिल्यानंतर खोडा पहाड, निकाला कचरा, अशी त्याची अवस्था झाली. केवळ भाजपच्या गुडबुकमध्ये राहायचे यासाठी राणे याची केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटते.

सत्तेसाठी स्वाभिओमान घाण ठेऊन लाचारी कशा प्रकारे स्वीकारायची हे राणेंकडून शिकावे. ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणे हे निश्चितच केन्द्रियपदाचा वापर करून केलेला दुरुपयोग आहे. यामागचे काय कारण असेल तर त्यांनी ईडीच्या नावाचा वापर करून ईडीच्या कार्यालयातून केलेल्या कागदपत्रांची चोरी असेल. नाहीतर एखाध्या शिकाऱ्यासोबत त्यांनी केलेली हातमिळवणी असेल, अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली.

Leave a Comment