Vinesh Phogat Joined Congress : कुस्तीपटू विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजपवर साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश (Vinesh Phogat Joined Congress) केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही खेळाडूंनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. मी अशा पक्षात आहे जो महिलांवरील अन्यायाविरोधात उभा आहे आणि रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे अशी प्रतिक्रिया विनेश फोगटने काँग्रेस प्रवेशावेळी दिली. तसेच भाजपवर गंभीर आरोप सुद्धा तिने केलेत. विनेश फोगटला हरियाणा मधुऊन काँग्रेस कडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

असहाय्य महिलांच्या पाठीशी उभी राहणार- Vinesh Phogat Joined Congress

काँग्रेस प्रवेशावेळी (Vinesh Phogat Joined Congress) विनेश म्हणाली, मी काँग्रेस पक्षाचे आभार मानते , कारण म्हणतात ना कि आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हाच समजत कि आपलं कोण आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावरून फरफटत नेलं जात होते तेव्हा भाजप सोडून सर्व पक्ष आमच्या पाठीशी उभं राहिले आणि आमच्या भावना आणि दुःख समजून घेतलं. आज मला अभिमान वाटत आहे कि मी अशा पक्षात आहे जो महिलांवरील अन्यायाविरोधात उभा आहे आणि रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे. इथून पुढे मी सर्व असहाय्य महिलांच्या पाठीशी उभी राहणार आहे असेही विनेश फोगटने म्हंटल. मला हवे असते तर मी जंतरमंतरवरही कुस्ती सोडू शकले असते. भाजपने मला सांगितलं होतं कि, नॅशनल खेळायचे नाही, पण तरीही मी नॅशनल खेळले, मी ऑलिम्पिकमध्ये गेली आणि फायनलमध्येही धडक मारली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी विनेश फोगट आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया यांनी बुधवारी काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही खेळाडूंसोबत राहुल गांधी यांनी 15 मिनिटे चर्चा केली, तेव्हाच हे दोन्ही खेळाडू काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांनी अधिकृतपणे काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला. देशसेवेसाठी मला मिळालेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे/वैयक्तिक कारणांमुळे ती OSD/क्रीडा म्हणून आपली कर्तव्ये पार पाडू शकत नाही असं तिने राजीनामा देतं म्हंटल.