हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीपटूसह एकूण तीन कुस्तीपटूंचा पराभव अंतिम फेरी गाठली आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर विनेश फोगटने रौप्यपदक तर निश्चित केलंच आहे. मात्र आजच्या सामन्यात जर तिने विजय मिळवला तर ती गोल्ड मेडल जिंकेल आणि नवा इतिहास रचेल. तत्पूर्वी संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु दुसरीकडे तिचा एक सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मात्र केंद्र सरकारवर टीका केली आहे. हि तीच मुलगी आहे जिला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले असं म्हणत बजरंग पुनियाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
बजरंग पुनियाचे ट्विट काय? Vinesh Phogat
याबाबत बजरंग पुनियाने ट्विट करत म्हंटल, विनेश फोगट, भारताची सिंहीण जिने आज मागच्या पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. 4 वेळा जागतिक चॅम्पियन आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्याचा पराभव केला. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या मुलीला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले, या मुलीला तिच्या देशात रस्त्यावर ओढले गेले ही मुलगी जग जिंकणार आहे पण या देशातील व्यवस्थेने तिचा पराभव केला असं म्हणत बजरंग पुनिया याने एकप्रकारे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
विनेश फोगाट भारत की वो शेरनी जिसने आज बैक टू बैक मैच में
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) August 6, 2024
4 बार की World Champion और मौजूदा ओलंपिक चैंपियन को हराया
उसके बाद क्वार्टरफाइनल में पूर्व World Champion को हराया
मगर एक बात बताऊं,
ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी
ये लड़की अपने देश में सड़कों पर घसीटी गई…
यानंतर बजरंगने आणखी एक ट्विट केलं, त्यामध्ये तो म्हणतो, विनेशच्या (Vinesh Phogat) विजयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नाहीये. आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे समजत नाही. संपूर्ण भारताला या पदकाची प्रतीक्षा आहे. सर्वांचे डोळे ओले आहेत. जणू काही विनेश एकटी नसून संपूर्ण देशातील सर्व महिला लढत आहेत. विनेश, तुझा जन्म खऱ्या अर्थाने विक्रम करण्यासाठी झाला आहे. इतक्या अडचणींचा सामना करूनही तुमची नजर ध्येयाकडे वळलेली असते. हे गोल्ड मेडल भारतात यावे हीच आमची प्रार्थना आहे.