जमिनीच्या वादातून सख्या भावांमध्ये तुंबळ मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा आणि त्याच्या कुटुंबाला सहा ते सात जणांनी मारहाण केल्याची घटना 24 जून रोजी संतोषी माता नगरात घडली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीच्या मेहुण्याला रविवारी अटक केले. पोपट हरिभाऊ चव्हाण ( रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी ) असे आरोपीचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला.

या प्रकरणात साहेबराव बन्सी राठोड रा. संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी यांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार वडिलांच्या जमिनीच्या वाट्यावरून फिर्यादी चा लहान भाऊ उत्तम राठोड हा सतत वाद घालत होता. 23 जून रोजी गिरनार येथे याच कारणावरून वाद झाले होते, तेव्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, 24 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उत्तम व त्यांचे मेव्हणे अनिल चव्हाण, पोपट चव्हाण, प्रल्हाद राठोड, बबलू राठोड, अनिल राठोड, यशोदाबाई चव्हाण आणि सुनीताबाई राठोड हे फिर्यादीच्या घरी आले.

दरम्यान, फिर्यादी सही टाईम ची पत्नी मुले व मेव्हणा पंडीत चव्‍हाण यांना मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळाने आरोपी अनिल, पोपट व बबलू हे तिचे फिर्यादीच्या घराच्या छतावरून घरात शिरले लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील समीर यांनी युक्तिवाद केला.

Leave a Comment