साताऱ्याचे सुपुत्र विपुल इंगवले यांना वीरमरण

0
77
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरेगाव तालुक्यातील भोसे येथील विपुल दिलीप इंगवले या जवानाला वीरमरण आले आहे. गेल्या एक वर्षापासून पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र, अखेर विपुल यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी दि. 6 रोजी सकाळी भोसे येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सियाचीन येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत येथे सेवा बजावताना जवान विपुल इंगवले यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याच्यावर पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये मागील एक वर्षापासून सुरू उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान जवान इंगवले यांची प्राणज्योत मालवली. विपुल इंगवले यांचे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गाव आहे. जवान हे 2016 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते.

जवान विपुल इंगवले यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांचा गावात शोककळा पसरली आहे.  आज 10 वाजता शहीद विपुल यांचे पार्थिव भोसे गावात दाखल होईल. त्यानंतर त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here