भारतीय गोलंदाजांची धुलाई होताना शास्त्री काडतायत डुलक्या ??; फोटो व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढली. अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीनं पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून देताना मजबूत पाया रचला. त्यावर स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी करून धावांचा डोंगर उभा केला. त्यात भर म्हणून ग्लेन मॅक्सवेलनेही तडाखेबंद खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 389 पर्यंत पोचवली.

ऑस्ट्रेलिया च्या सर्व फलंदाजानी आक्रमक फलंदाजी केली आणि वॉर्नर, फिंच आणि मग स्मिथ ने आक्रमक रूप अवतरलं होत. त्यातच ग्लेन मॅक्सवेलची चौकार-षटकाराच्या आतषबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी हतबल केलं. लाबुशेन ६१ चेंडूंत ७० धावा करून माघारी परतला. मॅक्सवेलनं २९ चेंडूंत नाबाद ६३ धावा केल्या. ऑस्टेलियानं ४ बाद ३८९ धावा चोपल्या.

एकीकडे भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री काय करत होते माहित आहे का? सध्या रवि शास्त्री यांचा फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. भारतीय प्रशिक्षक ज्यात डुलकी घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर शास्त्री यांचे डुलक्या घेतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि यूजर्स त्यांच्यावर मेम्स बनवून प्रतिक्रिया देत आहेत.यापूर्वीही शास्त्री यांचे असेच काही फोटो वायरल झाले होते.

शास्त्री यांचा हा फोटो मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून नेटकर्यांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment