तरुणानं ‘पहाटेच चीनवरून परत आलो’ म्हणताच खाली झाली संपूर्ण मेट्रो; व्हिडिओ टिक-टॉकवर व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीत असताना भारतात सुद्धा कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून बरेच जण आता तोंडाला मास्क लावून खबदारदारी घेतांना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाची दहशत भारतातही कशी पसरत आहे याबाबतचा एक विनोदी टिक-टॉक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका तरुणानं दिल्ली मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी एक अजब शक्कल लढवली ज्यामुळं संपूर्ण दिल्ली मेट्रो रिकामी झाली.

टिक-टॉकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक तरुण फोनवर बोलत असून त्याने ”मी पहाटेच चीनवरून परत आलो आहे ” असं म्हणताच प्रवाशांनी भरलेला संपूर्ण मेट्रोचा डब्बा एका क्षणात खाली झाल्याचे दाखवले आहे. याच कारण म्हणजे कोरोना व्हायरसची उत्पत्ती आणि प्रसार चीनमधूनच झाला आहे. हा व्हिडिओ अगदी विनोदी ढंगात कपिल कश्यप नावाच्या टिक-टॉक क्रिएटरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३.८ मिलियन व्यूज मिळाले असून ९८ हजाराहून अधिक लाईक्स आणि सुमारे ३०० कमेंट्स आल्या आहेत. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २८ पर्यंत पोहोचली असून त्यापैकी १६ विदेशी तर १२ भारतीय रुग्णांचा समावेश आहे.

@kapilkashyap628what an idea sir g#@realfunnyvideos @tiktok ##trending ##video #@1.million @theforyoupageoffical @tiktok_india♬ original sound – VIKAS SHARMA

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

 

Leave a Comment