डिलिव्हरी पॅकेजवर असे लिहिले होते- ‘मंदिरासमोर येताच फोन करा’, मग फ्लिपकार्टनेही दिलं ‘असं’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स वेबसाइटवरून वस्तूंच्या ऑर्डर केल्यानंतर प्रत्येक दिवशी काहींना काही गडबड झाल्याचे वृत्त समोर येते. कधीकधी बॉडी लोशन ऑर्डर केल्यानंतर महागड्या इअरबड्स डिलिव्हर केल्या जातात तर कधी चुकीच्या पत्त्यावर वस्तू दिल्या \ जातात. मात्र, अलीकडेच अशीच एक घटना उघडकीस आली असून, याची माहिती घेतल्यानंतर ती सोशल मीडिया वेबसाईटवर सतत व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजला फ्लिपकार्टनेही चांगला प्रतिसाद दिला आहे.

मंगेश पंडितराव नावाच्या ट्विटर युझरने अलीकडेच फ्लिपकार्ट डिलिव्हरी पॅकेजचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील डिलिव्हरी पॅकेजवरील ”Shipping/Customer address’ सेक्शन मध्ये जे लिहिले होते, त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

 

राजस्थानच्या कोटा शहरात डिलीवर करण्यात येणाऱ्या या पॅकेजवर असे लिहिले होते की, ‘448 चौथ माता मंदिर, मंदिरासमोर येताच फोन करा मी येऊन घेऊन जाईन.’ या ट्विटर युजरने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘भारतीय ईकॉमर्स पूर्णपणे वेगळी आहे ‘

हा फोटो शेअर केल्यापासून तो सातत्याने व्हायरल होत आहे तसेच आतापर्यंत 13.5 हून अधिक वेळा लाईक मिळालेले आहे. तर सुमारे 2.8 हजार वेळा हे रीट्वीट केले गेले आहेत.

यावर फ्लिपकार्टनेही एक उत्तर दिलं आहे आणि हे उत्तर असं आहे की, हे वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. यावर फ्लिपकार्टने लिहिले की ‘घर हे एक मंदिर आहे’, आम्ही ते एका नवीन स्तरावर नेऊन ठेवत आहोत.

 

 

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment