Viral Video : अवघे 95 वयमान ! आजी चालवतायत कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : खरं तर असं म्हणतात की कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वय लागत नाही. फक्त शिकण्याची जिद्द मनात असली पाहिजे. हे अगदी खरं आहे याची प्रचिती तुम्हाला सोशल मीडियावर हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून येईल. सध्या सोशल मीडियावर ९५ वर्षांच्या आजी गाडी चालवत असतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ९५ वर्षे वय असलेल्या या आजींचे नेटकऱ्यानी सुद्धा खूप कौतुक केले आहे. चाला पाहुयात नक्की काय आहे हा व्हिडीओ ?

काय आहे व्हिडिओत ? (Viral Video)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की एक आजी लाल स्वेटर घातलेल्या आहेत आणि त्या ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडी चालवत आहेत तर त्यांच्या साईडला त्यांचा नातू बसला आहे. जो हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. हा नातू म्हणतो “मी माझ्या आजीला गाडी चालवायला शिकवतो आहे. आजी थम्सअप कर” तेव्हा ही आजी मोठ्या उत्साहाने थम्सअप करते त्यानंतर हा नातू या व्हिडिओमध्ये तिला विचारतो की, ‘आजी गाडी चालवताना कसं वाटत आहे ? तेव्हा ही आजी एकदम हळू आवाजात उत्तर देते की मला भीती वाटते आहे. आजी आणि नातवाचा हा संवाद तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळेल.

पुढे हा नातू आपल्या आजीला (Viral Video) विचारतो की, आजी तू पहिल्यांदाच गाडी चालवते ना तर तर आजी त्याला हो असं उत्तर देते हा संवाद चालू असताना आजी त्या नातवाकडे पाहत असते तेव्हा नातू आजीला सांगतो आजी पुढे पाहून गाडी चालव. वय वर्ष 95 वाजता सुद्धा आजीचा उत्साह बघून तुम्ही नक्की आजीचं कौतुक कराल. पुढे नातू या आजीला विचारतो की आणखी काय काय चालवलं तेव्हा आजी उत्तर देते की रायफल चालवली आहे. संवादावरून आपण अंदाज लावू शकतो की आजी खरंच धाडसी स्वभावाची आहे.

आज तो दिन बन गया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @the_phoenix_soul या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘माझी ९५ वर्षांची आजी पहिल्यांदाच गाडी चालवत आहेत’ ; असे कॅप्शन लिहिले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला एक लाख तीस हजार 319 लाइक्स मिळाले आहेत. तर दोन हजार पेक्षा जास्त युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने प्रतिक्रियेत म्हंटले आहे की, ‘आजी 95 वर्षाच्या असताना गाडी चालवत आहेत मला तर आताही येत नाही’. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, ‘आजीकडे पाहून आजी इतकी कॉन्फिडंट वाटते आहे की ती पहिल्यांदा गाडी चालवते हे विश्वास बस न बसण्यासारखे आहे. शिवाय ती गाडी चालावताना बोलत देखील आहे’. आणखी एका युजरने या व्हिडिओमुळे (Viral Video) ‘आज तो दिन बन गया’ असे म्हंटले आहे.