…जेव्हा अजित पवार क्रिकेटच्या मैदानात देखील करतात जोरदार फटकेबाजी ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय मैदानात आपल्या वक्तृत्वाने समोरच्याला जोरदार टोले लगावण्यात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच चर्चेत असतात. अजित पवारांच्या फटकेबाजीमुळे चांगले चांगले गारद झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता अजितदादांनी क्रिकेटच्या मैदानात देखील जोरदार फटकेबाजी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या ठिकाणी भेट दिली.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/3526894400761295/

आता अजित पवार खुद्द मैदानात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी अजितदादांना बॅटिंग करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे अजितदादांनीही बॅट हातात घेतली. उचलून मारा असं म्हणत कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावांनी एकच घोषणाबाजी केली. मग काय, अजितदादांनीही मोठ्या उत्साहाने आलेला बॉल चांगलाच टोलावला. अजित पवारांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment