हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रीयन लोकांच्या रोजच्या जेवणामध्ये वरण-भात,चपाती, भाजी असे विविध प्रकार असतात. चपाती ही जेवणामध्ये खूप महत्त्वाची असते. परंतु अनेक गृहिणींना तासनतास किचनमध्ये उभे राहून चपात्या करण्याचा खूप कंटाळा येतो. परंतु त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढे गरम होत असताना किचन समोर उभे राहून चपात्या करणे खूपच कठीण जाते.
परंतु आता तुम्हाला चपात्या भाजण्याचा काही त्रास राहणार नाही. कारण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये (Viral Video )तुम्हाला काहीही कष्ट न करता तुमच्या चपात्या भाजल्या जाणार आहेत. कुकरमध्ये चपाती करण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक महिला चपात्या शेकताना दिसत आहे. चपात्या करण्याची ही ट्रिक सध्या वायरल झालेली आहे. अनेक लोक चपाती करण्यासाठी तासनतास लावतात, परंतु आता या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही काही मिनिटातच चपात्या बनवू शकता. खास करून बॅचलर लोकांसाठी ही ट्रिक अत्यंत उपयोगात येणार आहे
प्रेशर कुकरमध्ये या पद्धतीने करा चपाती | Viral Video
सगळ्यात आधी तुम्ही गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात पाणी मिसळून छान गोळा तयार करून घ्या. आणि काही वेळासाठी तो पिठाचा गोळा बाजूला ठेवा. त्यानंतर छोटे छोटे लिंबाएवढे गोळा गोळे करून ते लाटून घ्या
त्यानंतर या लाटलेल्या कच्च्या चपात्या एका प्लेटवर ठेवा. या चपात्या एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर सुके पीठ लावून ह्या चपात्या लाटून घ्या. त्यात आठ ते दहा चपात्या तयार करून घ्या.
त्यानंतर मोठ्या आकाराचा एक प्रेशर कुकर घ्या आणि त्यात एक वाटी पालथी घाला. जीव तुम्ही स्टीलचा एक चपटा डबा देखील घेऊ शकता. ज्यावेळी हा प्रेशर कुकर गरम होईल त्यावेळी सर्व चपात्या उलट्या वाटीवर ठेवा. प्रेशर कुकरचं झाकण बंद करा आणि शिट्टी लावलेली नसेल याची काळजी घाय.
अशा पद्धतीने तुम्ही काही मिनिटात चालत्या तयार करू शकता. नंतर प्रेशर कुकर गॅसवरून खाली उतरून हळूहळू झाकण उघडा. आणि चिमट्याच्या मदतीने चपात्या काढून घ्या आणि गरमागरम खायला द्या.