Viral Video : खरं तर आई ही आईचं असते मग ती माणसाची असो किंवा प्राणी पक्षांची. आई आपल्या लेकरांची जीवापाड जपणूक करते. कितीही मोठ संकट आलं तर आई जीवाची बाजी लावून आपल्या लेकरांना वाचवते. असाच काहीसा प्रत्यय देणारा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका झाडावर सुगरणीची घरटी आहेत पण त्यातल्या एका घरट्यात सापाने प्रवेश केला आहे. मग आपल्या पिलांना वाचवण्यासाठी या इवल्याशा चिमण्या काय किलबिलाट करतात …. साप आणि चिमण्यांमधला या संघर्षांत कोणाचा विजय होतो ? चला पाहुयात …
काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हीडीमध्ये एक साप सुगरणीच्या घरट्यात तिची पिल्लं खाण्यासाठी गेलेला दिसतो आहे. एक सुगरण ह्या सापाला घरट्यातून बाहेर येण्यासाठी जिवाच्या आकांताने किलबिलाट करून चोच (Viral Video) मारून हटवण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढ्यात या चिमणीच्या मदतीला इतरही चिमण्या येतात आणि या सापाला चोच मारू लागतात. झाडाची फांदी लवचिक असल्याने ती वारंवार हालत आहे. आणि तेवढ्यात साप सुगरणीच्या घरट्यातून बाहेर येतो आणि दुरीकडे जाऊ लागतो. इवल्याशा चिमणीपुढे विषारी साप हारतो. असा हा व्हिडीओ आहे.
साप आणि चिमण्यांमधील संघर्षाचा हा व्हिडीओ थेट सोशल मीडिया यूज़र्सला (Viral Video) भावला असून हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इंस्टाग्रामवर Travel Explore Protect नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ज्याचे 2 लाख 20 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा व्हिडीओ शेअर करता ना लिहिले आहे की , ‘साप Vs पक्षी… निसर्गाला तोड नाही. या घरट्यात जे काही होतं ते वाचवण्यासाठी पक्षी विषारी साप बूमस्लँगवर हल्ला करतात. जो घरट्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही कधी पक्षांना असं लढताना पाहिलं आहे का? बघितलं नसेल तर हा व्हिडीओ (Viral Video) शेवटपर्यंत बघा, अंडी वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला का?