हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याच काही पक्कं असं सांगता येत नाही. कारण जो तो प्रसिद्धी झोतात यायला काही ना काही करतच असतो. आजकाल सोशल मीडियावर जुगाड व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतात. जगभरात जुगाडू लोकांची कमी कमी नाही. त्यामुळे अशा व्हिडीओंना दिवसेंदिवस मार्केट येतंय. इलेक्ट्रिक स्कुटी, मेणबत्तीवर चालणारी गाडी असे बरेच जुगाड तुम्ही पाहिले असतील. अशातच एका तरुणाने पेट्रोल वाचवण्यासाठी केलेला जुगाड सोशल मीडियावर व्हिडीओ स्वरूपात व्हायरल होताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
आपल्या गाडीतील पेट्रोल संपले की, लोक अगदी सहज कुणाच्याही बाईकमधून पेट्रोल काढून घेतात. यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. मात्र, या व्यक्तीने केलेला जुगाड काही वेगळाच आहे. या माणसाने एका गाडीतून पेट्रोल काढून सहज दुसऱ्या गाडीत कसे टाकले? ते यामध्ये दिसत आहे. (Viral Video) यात दिसतंय की, ही व्यक्ती अतिशय काळजीपूर्वक तंबाखूची रिकामी पाकिटे उघडत आहे. यानंतर त्यात पेट्रोल भरून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीत टाकत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
सोशल मीडिया X वर SonuMdevi नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) ज्याला आतापर्यंत ३ लाख ७६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर हजाराहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘हा जुगाड राजस्थानच्या बाहेर जाऊ नये’. यावर आता लोक प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर येणाऱ्या प्रतिक्रिया मिश्र स्वरूपातील आहेत. कुणाला हा जुगाड आवडलाय तर कुणी ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही.