Viral Video : भारतामध्ये फुडीजची काहीच कमी नाही, सोशलमिडीयावर सुद्धा खाद्यपदार्थांबाबत दररोज नवनवे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज पाहून अशा लज्जतदार डिश कधी एकदा ट्राय करिन असे होत असेल. मात्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहूनच तुमच्या तोंडाची चव गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एव्हाना पनीर पराठा, मेथी पराठा , असे पराठ्याचे बरेच प्रकार पहिले आणि ट्राय केले असतील. पण तुम्ही कधी डिझेल पराठा ऐकलंय काय ? पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या संबंधीच्या व्हिडिओने (Viral Video) सर्वांनाच हादरवले आहे.
नक्की काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)
फूड ब्लॉगरचा दावा आहे की ती व्यक्ती डिझेलमध्ये पराठे बनवत आहे. या व्हिडीओ मध्ये फूड ब्लॉगर सांगतो की, लोक इथे मोठ्या उत्साहाने जेवायला येतात. यावर पराठा बनवणारा तरुण म्हणतो की, तुम्हाला खायला मजा आली नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार करा. पराठा बनवणारा तरुण सांगतो, की तो डिझेलमध्येे पराठा बनवत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तो डिझेल पराठा (Viral Video) बनवत असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे.
There is an update that sufficient action has been taken based on this viral video
— NebulaWorld (@nebula_world) May 14, 2024
And it's prudent in the interest of justice, the original tweet is being taken down..https://t.co/KUPWs5qTUf pic.twitter.com/WJAX2rlt4c
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय विचार करा की लोक निरोगी राहण्यासाठी तेलकट पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवतात, अशा परिस्थितीत या ढाब्यावर तयार केलेला पराठा कोणी खाल्ले तर काय होईल?
ढाबा मालकावर कारवाईची मागणी
सोशल माडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा डिझेल पराठा पाहून नेटिझन्सनी चिंता व्यक्त केली असून हा व्हिडिओ प्रथम X हँडल @nebula_world वर शेअर करण्यात आला होता, परंतु आता तो काढला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले होते,’ पेट्रोल डिझेलसोबत पराठा. कॅन्सरची हीच खरी रेसिपी आहे’. व्हायरल झालेल्या क्लिपने (Viral Video) अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर संतप्त इंटरनेट वापरकर्त्यांनी FSSAI ला टॅग केले आणि संबंधित ढाबा मालकावर योग्य कारवाईची मागणी केली.