बॉस पगार देत नाही म्हणून कर्मचाऱ्याची सटकली; थेट जेसीबी घेतला अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जेसीबी मशीनने रागाच्या भरात अनेक ट्रकची तोडफोड करताना दिसत आहे. हा व्हायरल विडिओ तुर्कस्तानातील कोळसा खाणीतील आहे. या कर्मचाऱ्याने असे करण्यामागचे कारण ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल. या व्यक्तीने बॉसने पगार न दिल्यामुळे (non payment of salary) थेट ट्रकची तोडफोड केली आहे. हकन एम असे तोडफोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

ज्यावेळी त्याच्या बॉसने त्याला पगार देण्यास (non payment of salary) नकार दिला. हा बॉस दुसरा कोणी नसून त्या व्यक्तीचा काका आहे. मात्र पगार मिळणार नाही (non payment of salary) म्हणून या व्यक्तीचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात जेसीबीने पाच ट्रक फोडले. तुर्कस्तानच्या सिरनाक प्रांतातील खाणीजवळ हा प्रकार घडला आहे. हकन यांनी जेसीबी मशीनच्या साह्याने अनेक ट्रक अक्षरश: चिरडले.

यावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना नेमके काय झाले ते समजले नाही. मात्र समोरील प्रकार बघताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हकन प्रचंड चिढला होता व गाड्या फोडत होता. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची समजूत काढली. खूप समजावून सांगितल्यावर हकन शांत झाला. मात्र तोपर्यंत त्याने अनेक ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!