Viral Video | रीलसाठी तरुणाने रेल्वेरुळावर बांधला चक्क जिवंत कोंबडा; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर रोज नवनवीन कंटेंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आणि आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी काहीही करायला तयार झालेले आहेत. अगदी लाईक मिळवण्यासाठी आणि व्ह्यूज वाढण्यासाठी कोणतेही धोकादायक कृत्य करायला देखील ते मागेपुढे पाहत नाहीये. सध्या असाच एक वेळेस सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरुण रेल्वे रुळावर चक्क धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण रेल्वे रुळावर सायकल ठेवत आहे. त्यानंतर त्यावर तो काही दगड ठेवतो. आणि काही वेळाने लहान गॅस सिलेंडर देखील रूळावर ठेवल्यास दिसत आहे. इथपर्यंत या गोष्टी खूप धोकादायक होत्या. परंतु त्याने पुढे असे कृत्य केले की ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसेल.

या सगळ्या गोष्टी त्याने रुळावर ठेवल्यानंतर त्याने चक्क जिवंत कोंबडा त्या रेल्वेवर ठेवला. रेल्वे रुळावर त्याने जिवंत कोंबडा बांधला आणि रेल्वेची वाट पाहताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियाच्या अनेक अकाउंटमधून हा व्हिडिओ व्हायरल झालेला दिसत आहे. याआधी देखील त्याने सोशल मीडियावर अनेक असे धोकादायक एक व्हिडिओ शेअर केलेले आहे.

या तरुणाचे नाव गुलजार शेख असे आहे. तो यूपीतील आहे. तो सध्या युट्युबर आहे आणि youtube द्वारे पैसे मिळवण्यासाठी तो रेल्वे रुळावर अशा घातक गोष्टी ठेवत असतो. आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतो. त्यामुळे आता त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असे देखील म्हणण्यात आलेले आहे. अनेक लोक सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त करत आहेत. त्याच्या फेमस होण्यासाठी अनेक गोष्टी तो करताना दिसत आहेत. आणि अशा गोष्टींना आळा घातला पाहिजे असे देखील लोक म्हणत आहेत.