Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारणार संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue । स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. जिजामाता उद्यानात हा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला असून उद्या ४ फेब्रुवारीला या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या पुतळ्याचं अनावरण म्हणजे रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. खरं गोवा, केरळप्रमाणे रत्नागिरीतही स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. परंतु या दोन्ही राज्यांचा विकास ज्याप्रमाणे झाला आहे तितका अपेक्षित पर्यटन विकासकोकणासह रत्नागिरीचा झालेला नाही. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने व्हिजन म्हणून मंत्री उदय सामंत काम करत आहेत.

काय आहे संभाजी महाराजांच्या पुतळ्याची खासियत – Chhatrapati Sambhaji Maharaj Statue

रत्नागिरी येथील संभाजी महाराजांचा पुतळा हा 56 फूट आहे. त्यामधे पाया 35 फूट व त्यावर 21 फूट अस मिळून 56 फुटाचा हा पूर्णाकृती पुतळा आहे. हा पुतळा उभा करण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. याशिवाय, रत्नागिरी मधील माळणाका येथे 30 फुटाची विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली असून त्याचा खर्च 1.25 कोटी इतका आहे. रत्नागिरी येथील जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, माळनाका येथील विठ्ठलाची मूर्ती आणि भगवती किल्ल्यावरील शिवसृष्टीमुळे रत्नागिरी स्टॅच्यू सिटी (Ratnagiri Statue City) म्हणून नावारूपाला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाजारांनी अत्यंत निडरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली आणि स्वराज्याचे रक्षण केलं अशा असामान्य व्यक्तिमत्वाचा राज्यातील सर्वात उंच पुतळा (Chhatrapati Sambhaji Maharaj Statue) हा रत्नागिरीत तयार झाला आहे.

आज कौशल्य विकास केंद्रांपासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाल्या. रत्नागिरी शहरातही पर्यटक थांबावा आणि त्यानुसार रत्नागिरीचा पर्यटन विकास साधण्यासाठी वेगळी संकल्पना उदय सामंत यांनी मांडली असून, ती सत्यात उतरत आहे. रत्नागिरी शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेले थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थळ, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ठेवलेल्या विशेष कारागृहालाही पर्यटक भेट देतात आणि निघून जातात. यामुळे अपेक्षित पर्यटन विकास होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत.