Viral Video : बर्गर मध्ये हटके कॉम्बिनेशन ! पाहिलात का मोमोवाला बर्गर ? लोक म्हणतायत yummy …!

viral video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : खरंतर बर्गर पिझ्झा यासारखे पदार्थ मुळात परदेशी असले तरी जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपलं एक स्थान भक्कम केलं आहे. भारतातही हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. पण भारतीय लोकांना खाद्यपदार्थात एक भारतीय टच लागतोच , म्हणजे नूडल्स हा मुळपदार्थ चायना मध्ये प्रसिद्ध असला तरी भारतीयांनी त्याला समोसा मध्ये स्टफ करून चायनीज समोसा बनवला. त्याचप्रमाणे सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असून यामध्ये बर्गर मध्ये चक्क मोमोज आणि नूडल्स भरले आहेत. बर्गरचे हे अनोखं फ्युजन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका फूड ब्लॉगर ने शेअर केला आहे. एव्हढेच नाही तर हे कॉम्बिनेशन लोकांच्या पसंतीसही उतरले आहे. चालतर मग जाणून घेऊया या व्हिडीओ (Viral Video) बद्दल…

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) विक्रेता मोमोज बर्गर तयार करताना दिसत आहे. यासाठी, सर्वप्रथम, तो बर्गर बन्स हलकेच टोस्ट करतो. यानंतर तंदुरी मेयोनेझ आणि पांढरे मेयोनेझ घालतो . यानंतर टोमॅटो आणि गाजराचे तुकडे आणि चिरलेला कांदा सोबत केचप टाकला जातो. त्यानंतर, त्याने एका बनवर बर्गर पॅटी आणि दुसऱ्यावर तीन मोमोज ठेवले. मोमोज ठेवल्यानंतर त्यावर मूठभर नूडल्स, मेयोनीज आणि हिरवी चटणी घालतो. अशा पद्धतीने मोमोस बर्गर तयार केले आहे.

अनेकांना आवडलाय मोमोजबर्गर (Viral Video)

View this post on Instagram

A post shared by Hnv Street Food (@hnvstreetfood)

हा व्हिडिओ hnvstreetfood या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) झाला असून लोकांना ही नवीन डिश खूप आवडली आहे. एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे की , “किती छान आहे… स्वादिष्ट… मी आधीच ट्राय केला आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की , “स्वादिष्ट.” “व्वा, छान वाटतंय.” बऱ्याच लोकांनी फायर इमोजी आणि रेड हार्ट इमोजींनी कमेंट सेक्शन भरला आहे . तर अनेकांनी या बर्गर स्टॉलचा पत्ताही विचारला आहे.