व्हायरल व्हिडिओः गोरिलाने ‘बिग बॉस’च्या या माजी स्पर्धका सोबत नाचत जिंकले सर्वांचे हृदय…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘खतरों के खिलाडी’ हा एक्शन वर आधारित असलेला रिऍलिटी शो चा सीझन १० येत्या २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा सेलिब्रिटी त्यांच्या भीतीवर नियंत्रण ठेवून जिंकताना दिसू शकतील.’खतरों के खिलाडी-डर की युनिव्हर्सिटी’चा एक मजेदार प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिग बॉस स्पर्धक करिश्मा तन्ना गोरिला जातीच्या माकडा बरोबर नाचताना दिसत आहेत.’सजना पे दिल आ गया’ या गाण्यावर करिश्मा तन्ना आणि हे गोरिला माकड जोरदार नाचत आहेत आणि सोशल मीडियावर या व्हिडिओलाही चांगली पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ कलर्स चॅनेलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

रोहित शेट्टी स्वतः खतरों के खिलाडी चा सीझन १० होस्ट करणार आहेत आणि यावेळी शोचे शूटिंग बल्गेरियात झाले आहे. खतरों के खिलाडीच्या या सीझन मध्ये टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना, अदा खान, करण पटेल, शिविन नारंग, तेजस्वी प्रकाश, कॉमेडियन बलराज स्याल, अमृता खानवलकर, भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी, आरजे मलिष्का आणि नृत्य दिग्दर्शक धर्मेश येलांडे यांनी सहभाग घेतला आहे.यावेळची टॅग लाईन म्हणजे ‘डर लेगा क्लास, देगा त्रास’ आहे आणि अशा प्रकारे या नामांकित सेलिब्रिटींना स्टंट्स करून आपल्या भीती वर मात करणे भाग पडेल.

रोहित शेट्टी धोकादायक खतरों के खिलाडी चा सीझन 10 विषयी म्हणाले की, ‘जेव्हा मनात भीती येते,तेव्हा लोक पावले मागे घेतात, परंतु खतरों के खिलाडी मध्ये असे होत नाही. या कार्यक्रमासह माझा हा पाचवा सीझन आहे आणि मी नेहमीसारखेच या वेळीही स्पर्धकांना त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहे. जेव्हा हे स्पर्धक अंगावर शहारेआणणारे आणि वेदनादायक स्टंट्स करतील, तेव्हा बल्गेरियातील निसर्गरम्य वातावरण देखील पूर्णपणे फिके ठरतील. अशाप्रकारे स्पर्धकांना या हंगामातही जबरदस्त धक्का देण्याची खात्री तयारी रोहित शेट्टी यांनी केली आहे.

 

Leave a Comment