हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या भारतात अनेक लोक क्रीडाप्रेमी आहेत. यातील अनेकांचा क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. अनेकांसाठी क्रिकेट हा नुसता खेळ नाही तर ही एक भावना आहे. IPL, वर्ल्ड कप तर संपूर्ण देशात उत्सवासारखा साजरा केला जातो. छोट्यातल्या छोट्या गल्लीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या चौकापर्यंत आणि लहान ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकातील क्रिकेट प्रेम या दिवसात दिसून येते. (Viral Video) भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे नुसता जल्लोष आणि आनंद आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अशाच एका क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्याने हे वेड जोपासण्यासाठी काय केलंय हे पाहून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक क्रिकेट प्रेमी तरुण आपल्या घराच्या छतावर नेट सेटअप उभारताना दिसतोय. नेटमध्ये क्रिकेटची आवड असणारी मुलं आपली कला पारंगत करण्यासाठी म्हणजेच क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी जातात. यासाठी एक विशिष्ट फी आकारली जाते. त्यामुळे अनेक तरुणांमध्ये क्रिकेटचा किडा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना नेट जॉईन करता येत नाही. पण म्हणून आपलं पॅशन सोडायचं नसतं. या तरुणाचा हा व्हिडिओ पाहून अशा अनेक क्रिकेट प्रेमी तरुणांना नक्कीच एक वेगळी ऊर्जा मिळेल, एवढं नक्की!!
या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती बांबूला ड्रिल मशीनने छिद्र पाडून गच्चीच्या काठावर उभे करताना दिसतोय. यानंतर क्रिकेट नेट टाकून ग्रीन पिच तयार केला जातोय. एकंदरच हा पूर्ण सेटअप पाहून कोणाही व्यक्तीला हातात बॅट घ्यावी वाटेल. क्रिकेटचं मैदान जसं दिसतं अगदी तसाच हा सेटअप उभारण्यात आला आहे. ग्रीन पीच, बाजूने ब्ल्यू नेट आणि लाईट्समुळे हा परिसर फारच आकर्षक दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या तरुणाच्या नेट सेटअपचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर tanzeem_malik नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. यातील बरेच युजर्स हा नेट सेटअप तयार करायला किती खर्च आला? याची विचारणा करत आहेत. तर काही युजर्सने हे याला क्रिकेट प्रेम नव्हे तर क्रिकेट वेड म्हणत आहेत.
(Viral Video)याशिवाय आणखी एका युजरने असेही म्हटले आहे की, ‘हे फक्त आणि फक्त क्रिकेट प्रेमीच फील करू शकतो’. एकंदरच या व्हिडिओला क्रिकेटप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.