कोणतेही जुगाड करायचे असेल तर भारतीय त्यासाठी सगळ्यात पुढे असतात. यांच्या जुगाडा पुढे कुणीही काहीही करू शकत नाही. असाच तंत्रज्ञानाच्या मदतीने एक जुगाड झालेला आहे. जे पाहून सगळेजण थक्क झाले आहे. हा जुगाड करण्यासाठी जास्त काही पैसा लागत नाही, त्याचप्रमाणे जास्त काही गोष्टींची पण गरज लागत नाही. पण याचे परिणाम पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. आजकाल सर्वत्र याच व्हिडिओची चर्चा आहे.
आज-काल गाडी असेल तर सगळ्यांनाच त्यांच्या पेट्रोलची आणि डिझेलची काळजी असते. कार 10 ते 12 किलोमीटर आणि बाईक असेल तर 30 किलोमीटरचे ऍव्हरेज देते. परंतु हे ऍव्हरेज 90 झाले तर काय होईल? हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हा जुगाड एका भारतीयाने करून दाखवलेला आहे. ज्या व्यक्तीने असे काही जुगाड केले आहे की गाडीचे ऍव्हरेज 90 किलोमीटर झालेले आहे.
या व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती दावा करत आहे की त्यांनी एक लहान डिवाइस तयार केले आहे. हे डिवाइस त्याने बाईच्या दोन टोकांना जोडलेले आहे. यामुळे 10 ते 15 किलोमीटर ऍव्हरेज देणारी बाईक 90 किलोमीटर ऍव्हरेज देते. हे डिवाइस केवळ ऍव्हरेज वाढवणार नाही, तर गाडीमधून निघणारा धूर देखील कमी करणार आहे. त्यामुळे या उपकरणाचा वापर करून तुम्ही कोणत्याही गाडीचे ऍव्हरेज वाढवू शकता.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. यावर अनेक लोकांनी कमेंट देखील केली आहे. अनेक जनतेचे कौतुक करत आहेत, तर अनेकजण हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचे म्हणत आहे. एका युजर आहे की, हे जुगाड पूर्णपणे फेक आहे. यात काही सत्य नाही तर दुसरा एकाने लिहिलेले आहे की, “हे जर खरे असते तर कंपन्यांनी नक्कीच त्याचा प्रयत्न केला असता.”