Viral Video : अंगात मस्ती!! चालत्या स्कुटीचे हॅण्डल सोडून तरुणाचा डान्स; VIDEO पाहून युजर्स भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं सगळ्यात सोप्प साधन झालं आहे. काही केलं की, प्रसिद्ध होता येतं. म्हणून लोक खरोखरचं काहीही करू लागले आहेत. परिणामी, सोशल मीडियावर कधी? काय? पहायला मिळेल याचा काहीही नेम नाही. जो तो इथे प्रसिद्धीसाठी चित्र विचित्र चाळे करताना दिसतो. सोशल मीडियावर सर्वाधिक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी रेल्वे स्टेशन, कधी मेट्रो, कधी रस्त्यावर डान्स करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ आपण कायम पाहत असतो. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक तरुण चालत्या स्कुटीवर डान्स करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाशी खेळ करणारे तुम्ही बरेच पाहिले असतील. हा व्हिडीओ देखील अशाच एका तरुणाचा आहे. जो चालत्या स्कुटीवर बसून डान्स करतो आहे. मुख्य म्हणजे, यावेळी त्याने स्कुटीचे हॅण्डल सोडून दिले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण इलेक्ट्रिक स्कुटीवर जातोय. दरम्यान, तो एका भोजपुरी गाण्यावर डान्स करतोय. यावेळी तो चालत्या स्कुटीचे दोन्ही हॅण्डल सोडून चक्क डान्स स्टेप्स करताना दिसतोय. त्याचे हे वर्तन फारच धोकादायक आहे, यात काही वाद नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील तरुण ज्या पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून प्रसिद्धीसाठी रील बनवतो आहे. ते पाहून अंगावर काटा येणे साहजिक आहे. (Viral Video) हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर प्रसिद्धीचा नाद किती वाईट आहे.. हे समजत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? आणि कोणी बनवला आहे? हे काही नक्की सांगता येणार नाही. पण जिथला कुठला आहे.. धोकादायक आहे हे नक्की. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून संताप व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ desimojito या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अशा लोकांमुळे जास्त अपघात घडतात’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video) एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘या लोकांमुळे रस्त्यावरून चालतानासुद्धा घाबरायला होतं’. तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘अशा सगळ्या मूर्खांवर त्वरित आणि कडक कारवाई व्हायला हवी.. अशा लोकांमुळे रोज नवा अपघात होतो’. अन्य एकाने म्हटले आहे की, ‘या घटनेचे लोकेशन कळवा.. मी लगेच तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला टॅग करते.. अशांना अद्दल घडायला हवी’.