Viral Video | ना तवा, ना गॅस, पठ्याने कंप्युटरच्या CPU वरच बनवला आलू पराठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडिया हे तरुणांसाठी असे एक व्यासपीठ बनलेले आहे. जिथे प्रत्येकजण आपली नवनवीन कला सादर करत असतो. आपल्यातील कलागुणांना लोकांसमोर मांडण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन आहे. आपण सोशल मीडियावर अनेक वायरल व्हिडिओ पाहत असतो. काही व्हिडिओ अत्यंत हस्यास्पद असतात, तर काही व्हिडिओंमध्ये (Viral Video) त्या कलाकाराचे कौतुक करावे असे काही व्हिडिओ असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या (Viral Video) या व्हिडिओमध्ये त्या मुलाने चक्क कंप्युटरच्या सीपीयुवर पराठा केलेला आहे. असा आगळावेगळा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच हसायला येत आहे. आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच साथ निभाना साथिया या मालिकेतील गोपीची आठवत झाली असेल. जिने लॅपटॉप साबणाने धुतला होता आणि तो वाळत घातला होता आणि असेच काहीसे वेगवेगळे प्रयोग कि त्या मालिकेत करताना दिसायची. परंतु आता असाच एक खराखुरा व्हिडिओ समोर आलेला आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये कम्प्युटर उघडलेले आहे. ज्यावर एक व्यक्ती इंजेक्शनच्या मदतीने पेस्ट लावत आहे. जे एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने शिजवले जाते. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी थोडे थोडे पीठ घेतो आणि इंजेक्शनच्या मदतीने पाण्यात मिसळतो. त्यानंतर ते पीठ मळून घेतो आणि त्या पिठाचा गोळा बनवतो. त्यानंतर तो बटाट्याची भाजी त्या पिठामध्ये भरून तो लाटतो. त्यानंतर तो पॅनलवर असलेल्या सीपीयूच्या भागावर तेल लावतो आणि तो पराठा त्या ठिकाणी ठेवून दोन्ही बाजूंनी भाजतो. भाजल्यानंतर तो पराठा घेऊन तो सगळ्यांना दाखवतो.

असा पराठा करण्याची एक आगळीवेगळी स्टाईल त्याने या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पराठा बनवण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली आहे की, “हे काम अभ्यासाऐवजी केले जात आहे” दुसऱ्याने लिहिले की, ‘हा तर गोपी बहूचा भाऊ आहे.” अशाप्रकारे काही लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे तर काहीजण मात्र त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे.