हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) या वर्षातील पहिल्याच महिन्यात संपूर्ण देश वासियांनी पाहिलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे स्वप्न पूर्ण झाले. दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. दरम्यान जो तो श्रीरामाच्या भक्तीत दंग झाल्याचे पहायला मिळाले. श्रीराम मंदिर उद्घाटनानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसले. यांमध्ये एक असा व्हिडिओ चर्चेत आलाय ज्यामध्ये चक्क एक कावळा काव काव ऐवजी राम राम म्हणताना दिसतोय.
माहितीनुसार, हा व्हिडिओ अयोध्येतील असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आपण आतापर्यंत अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. मात्र हा व्हिडिओ या सर्वात फारच वेगळा आहे. काव काव करणारा कावळा चक्क राम राम म्हणताना पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती सेल्फी कॅमेरातून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसते आहे. (Viral Video) या व्हिडिओत ही व्यक्ती सांगते की, ‘अयोध्येत एक वैशिष्ट्य असे आहे की, इथे कावळा सुद्धा राम राम म्हणताना दिसतोय. पहा.’
पुढे ही व्यक्ती ‘राम’ म्हणते आणि त्यानंतर जवळच असलेला कावळा सुद्धा राम म्हणताना दिसतो. या व्यक्तीच्या पाठोपाठ हा कावळा सलग ‘राम’ नाम उच्चारताना दिसतोय. व्हिडिओत हि व्यक्ती पुढे म्हणते कि, ‘या सोहळ्याचा आनंद फक्त आपल्यालाच नाही तर पशुपक्ष्यांनाही झाला आहे.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.(Viral Video) आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ७ हजाराहून जास्त लोकांनी शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. यातील अनेकांनी ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा कमेंट केल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिलंय की, ‘काकभूशुण्डि ऋषी असेच राम नामाचा जप करत श्रीरामांना भेटण्यासाठी येत असत’. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून कावळ्याचा मुखी राम नाव ऐकून जो तो आश्चर्य व्यक्त करत आहे. Viral Video