हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Viral Video कांदा हा आपल्या भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा असा पदार्थ आहे. कांद्याशिवाय कितीतरी भाज्या करता येत नाही. या कांद्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. कांद्यामुळे आपले शरीर थंड देखील राहते. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक लोक कच्चा कांदा खातात. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि इतर काही गुणधर्म असतात. कांद्याचा वापर ग्रेव्हीसाठी त्याचप्रमाणे सलाडसाठी केला जातो. स्वयंपाक घरात देखील कांद्याशिवाय अनेक पदार्थ करणे शक्य होत नाही. परंतु हा कांदा कापणे (Viral Video) अनेकांना आवडत नाही. कारण कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. तज्ञांच्या मते या कांद्यामध्ये सायन प्रोपॅनिथीयल एस ऑक्साईड नावाचा एक रसायन असतं, जे रसायन आपल्या डोळ्यातून अश्रू येण्यास कारणीभूत ठरतं. हे डोळ्यांच्या संपर्कात येतात. अश्रू कोणती तर त्याचा परिणाम होतो. आणि डोळ्यातून पाणी येते.
अनेक स्त्रिया या कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये. म्हणून वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात कोणी कांद्याची साल डोक्यावर ठेवतात, तर कोणी कांद्याची साल काढून पाण्यात ठेवायला सांगतात. कांदा तिखट आहे असेल तोपर्यंत डोळ्यातून पाणी येते. एक डोळ्याची आग होते. आता यावर आपण एक भन्नाट ट्रिक जाणून घेणार आहोत.
कांदा कापण्यापूर्वी कोमट पाण्यात ठेवा | Viral Video
तुम्हाला कांदा कापण्यापूर्वी तो गरम पाण्यात ठेवायचा आहे. एका कढईमध्ये तो कांदा बुडेल एवढे पाणी घ्या. आणि ते पाणी कोमट होऊ द्या. त्यानंतर अख्खा कांदा ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा कांदा बाहेर काढा आणि नेहमीप्रमाणे साल काढून कांदा कापा. हा कांदा कोमट पाण्यात ठेवल्याने तुमच्या डोळ्यातून एकही अश्रू होणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्यांची आग देखील होणार नाही. हा व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवर व्हायरल झालेला आहे. त्यांनी ही एक ट्रिक वापरलेली आहे.