Viral Video : बापरे!! ताकात चीज घालून शिजवला पास्ता; खतरनाक फूड फ्युजनचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि प्रसिद्ध मिळवण्यासाठी आजकाल कोणीही काहीही करू शकतं. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिल्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. डान्स व्हिडीओ, हॉरर, कॉमेडी जॉनरचे व्हिडीओ, जुगाड व्हिडीओ आणि फूड फ्युजनचे व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ खरोखर कौतुक करण्यासारखे असतात. पण काही व्हिडीओ डोक्याला हात लावायची पाळी आणतात.

सध्या सोशल मीडियावर एक नवा फूड फ्युजनचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हे एक असं फूड फ्युजन आहे ज्याचा तुम्ही खरंच स्वप्नातही विचार केला नसेल. आजपर्यंत तुम्ही आईस्क्रीम सामोसा, कॉफी पास्ता, पिझ्झा ढोकळा असे वेगवेगळे फूड फ्युजनचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. यातील अनेक व्हिडीओंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Viral Video) अशातच आणखी एका व्हिडिओचा समावेश झाला आहे. या फूड फ्युजनचे नाव आहे ‘ताक-पास्ता’. होय. ताकात बनवलेला पास्ता.

कधी ऐकलाही नसेल असा पदार्थ ही व्यक्ती या व्हिडिओत बनवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला हा पदार्थ जिथे मिळतो त्या ठिकाणचा बोर्ड दाखवण्यात आला आहे. यावर ‘स्पे. मसाला छास पास्ता’ असे लिहिलेले दिसत आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे समजत आहे. या व्हिडिओत सुरुवातीला एक व्यक्ती कढईमध्ये कच्चा पास्ता आणि एक ग्लास पाणी घालते. यांनतर एक ताकाची अख्खी पिशवी त्यात रिकामी करते. यानंतर काही मसाले आणि चमचाभर तिखट घालून शेवटी भरमसाठ चीज किसून हा पास्ता शिजवला जातो.

एका मोठ्या डावाच्या मदतीने हा पास्ता ढवळून ताकाला उकळी काढली जाते. (Viral Video) शेवटी पुन्हा एकदा पास्तामध्ये पिझ्झा मसाला घातला जातो. आता तयार पास्ता एका फोम बाऊलमध्ये सर्व्ह केला जातो. सोशल मीडिया इंस्टाग्राम suratstreetfood नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Viral Video)

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. काहींनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘हा पदार्थ खाऊन माणसाला गंभीर आजार होऊ शकतात!’ आणखी एकाने म्हटलंय, ‘ताक आणि चीज अजिबात एकत्र करू नये. कृपया समाजाचा विचार करून अशा फालतू गोष्टी लोकांना खाऊ घालू नका’.