हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचे प्रमाण काहीच्या काही वाढलं आहे. प्रत्येकाला सोशल मीडियावर फेमस व्हायचंय आणि त्यामुळे जो तो काही ना काही अतरंगी करताना दिसतो. दरम्यान, यातील बरेच व्हिडीओ वायफळ तर काही मात्र खरोखरचं थक्क करून सोडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एका आज्जीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ही आज्जी यायच्या ७५ व्या वर्षी हेवी वर्कआउट करतां दिसते आहे. एकीकडे तरुण मंडळी व्यायामाच्या नावाने पळून जातात. तर दुसरीकडे उतार वयातील ही आज्जी पूर्ण एनर्जीने व्यायाम करताना दिसतेय.
७५ वर्षीय आज्जी करतेय हेवी वर्कआउट (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक आज्जी दिसत आहेत. ज्यांचे वय ७५ वर्ष असून त्या घरच्या घरीच हेवी वर्कआउट करताना दिसत आहेत. यावेळी आज्जीची एनर्जी इतकी हाय आहे की, हा व्हिडीओ पाहून तरुण मानली लाजेने पाणी पाणी होतील. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरच्या घरी सुद्धा किती एनर्जीने आणि पूर्ण उत्साहाने या आज्जी व्यायाम करत आहेत. कधी भितींचा आधार घेऊन तर कधी घरातील एखादी वस्तू उचलून या आज्जी व्यायाम करताना यामध्ये दिसत आहेत.
एकंदरच आज्जींचा उत्साह पाहून कुणालाही एनर्जेटिक वाटेल. ईच्छा असेल तर सगळं काही शक्य आहे, याची उपरती हा व्हिडीओ पाहून येईल. हा व्हायरल होणारा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल sada_yogafit नावाच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Viral Video)ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘७५ वर्षांची आहे, व्यायाम हा कोणत्याही वयासाठी चांगला आहे. तुम्हाला सल्ला देईल की आठवड्यातून एकदा तरी व्यायाम करावा. यामुळे तुम्ही स्वत:ला आजारांपासून सुरक्षित ठेवता आणि त्याचबरोर पालकांसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे’.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्स विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यातील एकाने लिहिले आहे की, ‘बघा हे आहे कलियुग. जिकडे वृद्ध लोक हिंमत दाखवतात आणि आमच्यासारखे युवा झोपा काढतात कारण, आमची झोपच कधी पूर्ण होत नाही’. (Viral Video) तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘खूप म्हणजे खूप छान!! आपल्या शरीराची काळजी घ्यायला कोणत्याही वयाचे बंधन नसते. प्रत्येक वयात आपण आपल्या शरीराची काळजी ही घ्यायलाच हवी’.