हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडीओ घरातील पाळीव प्राण्यांचे असतात. तर काही व्हिडीओ जंगलातील प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही व्हिडीओ मात्र धडकी भरवणारे असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या व्हिडिओत दोन हत्ती आपापसांत भिडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून पाहून अंगावर अगदी काटा उभा राहतोय.
केरळमधील घटना
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ केरळमधील आहे. (Viral Video) केरळमध्ये त्रिशूर येथील थरक्कल मंदिर उत्सवाच्या एका समारोप समारंभात ही थरारक घटना घडली आहे. या उत्सवात सामील झालेले दोन हत्ती अचानक बिथरले आणि सगळं परिसर हादरून गेला. या उत्सवादरम्यान एक हत्ती दुसऱ्या हत्तीला पाहून असा काही चवताळला की त्याने थेट समोरील हत्तीवर हल्ला केला. हा सर्व प्रकार शुक्रवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक हत्ती पुढे सरकतो आणि दुसऱ्या हत्तीला पाहून चवताळतो. यानंतर समोरील हत्तीला तो मागे ढकलतो. यानंतर, तो पुन्हा एकदा थोडा मागे जातो आणि वेगात धावत येऊन दुसऱ्या हत्तीला जोरदार टक्कर देतो. यानंतर दोन्ही हत्ती एकमेकांवर हल्ला करण्यासाठी पुढे मागे धावताना दिसतात. (Viral Video) एकमेकांशी भिडलेले हत्ती पाहून आजूबाजूचे सगळे लोक पळापळ करू लागतात. दरम्यान हत्तींची झुंज सुरु होते आणि आजूबाजूला माणसांची पळापळ दिसतेय.
माणसांची चेंगरा चेंगरी
या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही हत्तींचे भांडण लागले असताना त्यांच्यावर बसलेले माहुती देखील जखमी झाले आहेत. तर इतर अनेक लोक जे हल्ल्यातून बचाव होणेसाठी प्रयत्न करत होते त्यांच्यात चेंगरा चेंगरी झाली. दरम्यान, अनेक लोक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. हत्तींवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ज्यामुळे उत्सवात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. (Viral Video) यावेळी हत्तीने एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो थोडक्यात बचावला. सोशल मीडिया X हँडल Sanat Singh नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.