हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे व्हिडिओ तसेच रिल्स बनवून शेअर करताना दिसतात. यांपैकी अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात. आपल्या भारतात पाश्चात्य संस्कृतीला फॉलो करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र विदेशात जाऊन आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. यांपैकी एक तरुणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.
ही तरुणी परदेशात मिनी स्कर्ट आणि टॉपऐवजी लाल रंगाचा घागरा परिधान करून भारताच्या पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवताना दिसतेय. तिचा हा लूक इतका सुंदर आहे की फॉरेनर्स तिला वळून वळून पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर दिवसभरात शेकडो व्हिडिओ शेअर होतात. मात्र काही व्हिडीओ लक्षवेधी ठरतात. तसाच हा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो लंडनमधील एका स्पॅनिश भारतीय मॉडेलचा आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर shr9ddha नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, या तरुणीने सोनेरी रंगाचे भरीव नक्षी काम असलेला लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. त्यावर साजेसा शृंगार, दागिने आणि डोक्यावर बिंदी तिचा लुक आणखीच लक्षवेधी बनवत आहेत. इतकच नव्हे तर तिने नाकात घातलेली नथसुद्धा तिच्या लुकचा एक महत्त्वाचा भाग आहे. या लूमध्ये ही तरुणी एखाद्या नवरीसारखी दिसते आहे.
View this post on Instagram
(Viral Video)असा सुंदर भारतीय लूक करून ही तरुणी लंडनच्या मेट्रोमध्ये आणि रस्त्यांवर फिरताना दिसते आहे. यावेळी तिला पाहून परदेशी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचे शूटिंग करण्यात आले आहे. या व्हिडिओत पारंपरिक वेशभूषेतील तरुणीला पाहून जो तो तिच्याकडे टकमक पाहताना दिसतोय. तर काहींनी तिचे फोटो आणि व्हिडिओदेखील काढले आहेत. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
यांपैकी काही नेटकऱ्यांनी या तरुणीच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तर काहींनी मात्र तिने परिधान केलेल्या भारतीय पोशाखाचे आणि वेशभूषेचे कौतुक केले आहे. (Viral Video) या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘किती सुंदर दिसते आहेस.. एकदम नवरीसारखी’, तर आणखी एकाने लिहिलंय, ‘लक्षवेधी आहे खरंच..’. अन्य एकाने म्हटले, ‘भारतीय संस्कृतीचे सुंदर प्रदर्शन.. अभिमान आहे मला भारतीय असल्याचा..’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘असं भारतीय सौंदर्य पाहून कुणालाही वेड लागेल’.