Viral Video | तुम्ही कधी बर्फाचा शॉवर घेतलाय का? नसेल तर बघा या तरुणाचे देसी जुगाड

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत चाललेला आहे. अगदी घरात बसून देखील लोकांना गरम होते. त्यामुळे अनेक लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. सगळेच फॅन, कुलर याचा घरात वापर करतात. परंतु हवेमध्ये उष्णता असल्याने त्याचा जास्त काही फरक होत नाही. अशातच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने एक जुगाड शोधून काढले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

आजकाल अनेक लोक स्वतःचे असे काही जुगाड तयार करतात आणि सोशल मीडिया शेअर करत असतात. त्यामुळे आपल्याला घरबसल्या सगळी माहिती मिळत असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने थंड पाण्याने अंघोळ करण्याची एक वेगळीच युक्ती शोधून काढली आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. तसेच अनेकांना हा व्हिडिओ आवडत देखील आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका व्यक्तीने उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी एक देसी जुगाड शोधून काढले आहे. हे जुगाड तुम्ही या आधी कधीच पाहिले नसेल. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती शॉवर खाली आंघोळ करताना दिसत आहे. या शॉवरखाली त्यांनी लोखंडी तारांनी बांधून एक फिल्टर बसवले आहे. या फिल्टरमध्ये त्या व्यक्तीने बर्फाचे तुकडे ठेवले आहे. त्यामुळे शॉवरमधून येणारे पाणी आधी त्या बर्फावर येते आणि मग त्या व्यक्तीच्या अंगावर पडते. त्यामुळे त्याला थंडावा मिळतो.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 1.5 कोटी लोकांनी पाहिलेला आहे तर 4 लाख 15 हजारपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या या अनोख्या जुगाडाला शाबासकी देखील देत आहे.