हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) अनेकदा सोशल मीडियावर अशा काही व्हिडीओ व्हायरल होतात ज्या पाहून डोकं फिरून जात. यामध्ये फूड फ्युजनचे व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत असतात. कधी कधी अगदी आश्चर्य वाटेल असे फूड फ्युजन पहायला मिळतात. तर कधी किळसवाणे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. यामध्ये चाट, स्नॅक आणि अगदी में कोर्स डिशेसचा सुद्धा समावेश असतो. इतकंच काय तर कधी मॅगीमध्ये आमरस टाकतात तर कधी चहात गुलाबजाम. असे कितीतरी विचित्र फ्युजनचे व्हिडीओ मिनिटांत व्हायरल होतात. दरम्यान एका नव्या डिशचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तुम्ही आजपर्यंत जत्रेत वगैरे रंगबेरंगी किंवा काला खट्टा आईसगोला खाल्ला असेल. अनेकांना आईस गोला म्हणजेच बर्फाचा गोळा खायला खूप आवडतो. (Viral Video) हिमाचलमध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीने बर्फ खाल्ला जातो. आजकाल तसा ट्रेंडचं सुरु आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की बर्फ असाही खाता येतो? एखाद्या गोड सरबतात किंवा फ्लेव्हर्समध्ये बर्फ खूप खाल्ला असाल. पण कधी बर्फावर चिंचे- गुळाची चटणी आणि तिखट- मीठ- साखर टाकून बर्फ खाल्लाय का?
हिमाचल प्रदेशात अशा युनिक पद्धतीने बर्फ खाल्ला जातोय. ऐकून किंवा वाचून विश्वास बसणार नाही. म्हणूनच हा व्हिडीओ पहा. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ruc.hhiiiiii नावाच्या हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सर्वात आधी एका मोठ्या प्लेटमध्ये बर्फाचा गोळा दिसतोय. त्यानंतर ठेचून ठेचून त्याचे तुकडे केले जात आहेत. यानंतर त्यावर मस्त चिंच- गुळाची चटणी, हिरवी चटणी, तिखट, मीठ आणि साखर घालून चांगले मिसळले जात आहे. आता हे मिश्रण एका वाडग्यात चमच्याने खायला तयार झाले आहे.