Viral Video | भारतामध्ये जुगाड करणाऱ्या लोकांची अजिबात कमतरता नाही. अनेक लोक विविध गोष्टींचा वापर करून नवनवीन जुगाड करत असतात. आणि हेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात तुम्ही केलेले कोणतेही काम व्हायरल होत असते. आणि ते काम लाखो लोकांपर्यंत पोहोचत असते. भारतातील लोक असे जुगाड करतात की, मोठ-मोठे इंजिनियर देखील त्यांच्यासमोर हात टेकतात. अशा अनेक व्हिडिओ आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतात. सध्या अशाच एका व्हिडिओची (Viral Video) सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाने असा एक जुगाड केलेला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. याद्वारे बाईकमध्ये हवा भरता येते. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
कोणतेही वाहन चालवताना टायर हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यात जर हवा कमी असेल तर तुम्हाला रस्त्यावर नीट गाडी चालवता येत नाही. गाडी चालवताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. अनेक वेळा एखाद्या ठिकाणी जिथे मानववस्ती नसते, त्या ठिकाणी जर गाडीचा टायर पंचर झाला. त्यात हवा नसेल तर अशा ठिकाणी खूप समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्ही यंत्राच्या सहाय्याने सहजपणे तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरू शकता.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, एक व्यक्ती पाईप आणतो आणि त्याचे एक टोक खूप टायरमध्ये टाकतो. तर दुसरे टोक हे सायलेन्सर मध्ये ठेवतो. त्यानंतर तो आरामात बाईक सुरू करतो. परंतु ही बाईक तो रेस करत नाही. त्यानंतर सायलेन्सर मधून निघणाऱ्या धूर हवा टायरमध्ये भरली जाते. आणि दुचाकीच्या टायरमध्ये ती हवा भरते. आणि या धुरामुळे ही हवा अगदी सहजपणे भरली जाते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर X अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलेले आहे. तसेच अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया देत आहे. एका व्यक्तीने लिहिलेले आहे की, “हा जुगाड चांगला आहे, पण चालणार नाही. ” त्याचप्रमाणे दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, “भाईने हवा धुरात भरली आहे हा एक खूप चांगला प्रयोग आहे.” अशाप्रकारे अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट करून त्या व्यक्तीच्या कल्पनेला दाद देत आहेत.