Viral Video | सापाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. परंतु यापैकी किंग कोब्रा ही सगळ्यात खतरनाक सापाची एक जात मानली जाते. या सापामध्ये इतके विष असते की, काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मोठे शिकारी सुद्धा या किंग कोब्रा सापापासून लांब राहत असतात. अशातच या सापाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका लहानशा अजगराने या किंग कोब्राला विळख्यात पकडले आहे. हा व्हिडिओ पाहून असे समजत आहे की, हा अजगर जास्त विषारी नसला. तरी देखील त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. तो काही क्षणातच माणसाला घेऊ शकतो. कारण या अजगराच्या विळख्यात किंग कोब्रा सापडला आहे. त्याचे प्राण वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या (Viral Video) या व्हिडिओमध्ये अजगर आणि किंग कोब्रा यांच्यातील लढत दिसत आहे. किंग कोब्रा हा सगळ्यात विषारी साप आहे. या व्हिडिओमध्ये एका अजगराने किंग कोब्राचे तोंड पकडून त्याला दाबले आहे. किंग कोब्रा आकाराने देखील खूप मोठा असतो. परंतु अजगराच्या तावडीत सापडल्याने त्याला हालचाल देखील करता येत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच समजेल की, अजगर किती धोकादायक असतात. त्याने चक्क किंग कोब्राची शिकार केलेली आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे की, “ही लढत पृथ्वीच्या सर्वात मोठा साप किंग कोब्रा विरुद्ध पृथ्वीवरील सर्वात लांब बिन विषारी साप रेडीक्युलेटेड पायथॉन यांच्यात चाललेली आहे हा व्हिडिओ इंडो नेशियाच्या जंगलातील आहे.”
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. आणि त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. त्याचप्रमाणे अजगर आपल्यासाठी किती घातक आहे. हे देखील हा व्हिडिओ पाहून लोकांना समजत आहे.