हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत. म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीसुद्धा फिरायचा प्लॅन कराल. अशावेळी बॅगेत चिप्स, बिस्किट किंवा घरातून बनवलेल्या पदार्थांचे मोठ मोठे डबे घेऊन जाणे हा स्त्रियांच्या पिकनिकचा एक मोठा भाग असतो. तर काही लोक मात्र, जिथे फिरायला जातात तिथेच हॉटेलवर किंवा एखाद्या स्टॉलवर खाण्यापिण्याचा आनंद घेतात. यात काही चुकीचं आहे असं नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पहालं तर तुमचा तुमच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सहलीला जाण्यासाठी एका कुटुंबाने गाडीत स्वयंपाक घर तयार केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. चला तर पाहूया हा व्हिडिओ.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर आधारलेले असतात. यातील काही व्हिडीओ निष्फळ आणि कंटाळवाणे असू शकतात. (Viral Video) तर काही मात्र अगदी थक्क करून सोडतात. जसा की सोशल मीडियावर व्हायरल होणारा चिक्की आणि कपिल या जोडप्याचा हा व्हिडिओ. या जोडप्याने पिकनिकला जाण्यासाठी आपल्या गाडीमध्ये चक्क स्वयंपाक घर तयार केल्याचे दिसत आहे. ‘होम ऑन विल्स’ ही कन्सेप्ट सादर करत या जोडप्याने कारच्या डिक्कीत पूर्ण स्वयंपाक घर तयार केल्याचे पहायला मिळत आहे. अगदी ड्रॉवर, फळ्या, कप्पे आणि जेवण बनवण्यासाठी लागणारा डबल बर्नर गॅससुद्धा त्यांच्या गाडीत आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ नीट पाहिला तर समजेल की हे कुटुंब ४ जणांचं आहे आणि त्यांनी कॅम्पिंग ट्रिपसाठी कोणतेही हॉटेल बुक केलेले नाही. मात्र तरीही ते फॅमिली पिकनिकचा आनंद घेण्यात कुठेच कमी पडत नाहीयेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांपासून ते किराणा सामान आणि अगदी गॅसपर्यंत सगळ्या वस्तू ते गाडीतच घेऊन फिरतात. त्यामुळे फिरायला गेल्यानंतर खाण्या- पिण्यासाठी होणारा अधिक खर्च त्यांचा वाचवता येतोय. मुख्य म्हणजे या गाडीत नुसतं स्वयंपाकघर नाही तर झोपण्यासाठी गाडीच्या सीटवर गादीसुद्धा अंथरलेली दिसतेय.
(Viral Video) त्यामुळे हे नुसतं चालतं फिरतं स्वयंपाक घर नाही तर चालतं फिरतं घर आहे, म्हणायला हरकत नाही. शिवाय ना रेंट देण्याची चिंता ना रूम सोडण्याची घाई. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ghumakkad_bugz नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांना आकर्षित करतो आहे. या गाडीमध्ये स्वयंपाक घर बनवण्याच्या या संकल्पनेबाबत अनेकांना विविध प्रश्न पडल्याचे देखील दिसत आहे. तर काही लोकांनी ही संकल्पना कशी सुचली आणि याचा कसा वापर केला? याची विचारणा केली आहे. (Viral Video) काहींनी या सेटअपसाठी किती खर्च होतो? असेदेखील विचारले आहे.