हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) बऱ्याच लोकांना गूढ, रहस्य, चमत्कार अशा गोष्टींमध्ये फार रस असतो. त्यामुळे असे लोक कुठे फिरायला गेले आणि त्यांच्या नजरेस काही नेहमीपेक्षा वेगळे पडले तर त्यांची कुतूहलता सक्रिय होते. ज्यातून शोध लागतो नव्या गोष्टींचा. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी असे बरेच पराक्रम केले जातात. जे इतरांपेक्षा वेगळे सिद्ध होतील आणि आपल्याला लाईक्स, व्ह्यूज मिळतील. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक तरुण एका गुहेत प्रवेश करतोय. तर दुसरी व्यक्ती व्हिडीओ शूटिंग करत आहे. दरम्यान इक्वल एका टॉर्चच्या सहाय्याने हा तरुण गुहेत जाताना दिसतोय. आता जाताना त्याला काँक्रीट आणि विटांची भिंत दिसताच पुढे तो सांगतो की, ‘ही एक खूप खूप जुनी कोळशाची खाण आहे’. यानंतर हा तरुण गुहेच्या आत जाण्यासाठी झोपतो आणि मग प्रवेश करताना दिसतो. पुढे जाताच त्याला काही वेळानंतर आतमध्ये अत्यंत भव्य गुहेचा शोध लागतो.
हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर undergroundbirmingham नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘१८६० च्या दशकात एका बोगद्यात जाताना’. व्हिडिओतील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ही गुहा सुमारे १६५ वर्षे जुनी आहे. (Viral Video)या गुहेचा शोध घेणाऱ्या व्यक्तीचे इंस्टाग्राम नीट पाहिले तर समजेल की, आतापर्यंत या व्यक्तीने अशा बऱ्याच गुहांचा शोध घेतला आहे. शिवाय त्याच्या फॉलोवर्सचा आकडा देखील मोठा आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स देखील केल्या आहेत. त्यांपैकी एकाने लिहिले आहे की, ‘आम्हाला ही गुहा दाखविल्याबद्दल धन्यवाद! पण तुम्ही यातून बाहेर कसे पडलात?’. (Viral Video) तर आणखी एका नेटकऱ्याने काळजी व्यक्त करत म्हटले आहे की, ‘हे तुम्ही काय करताय.. जर कधी असे अडकलात, तर काय कराल?’.