Viral Video | रिल्ससाठी स्वतःलाच जमिनीत गाडले; धक्कादायक व्हिडीओ समोर

Viral Video

Viral Video | सध्या इंटरनेटचे युग चालू आहे. या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचे देखील सगळ्यांना मोठे व्यसन लागलेले आहे. या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. आपण सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे धक्कादायक आणि रोमांचक व्हिडिओ पाहत असतो. ज्यामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोक त्यांचा जीव देखील धोक्यात घालताना दिसत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये त्या पुरुषाने स्वतःला जमिनीखाली गाडलेले आहे. आणि ती महिला त्याला खायला घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्या पुरुषांवर टीका देखील करत आहे. हा व्हिडिओ पाहून एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, “रीलमुळे लोक वेडी झाले आहेत. आता ते विष बनले आहे.” तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेले आहे की, “आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार आणि समाज दोघांना मिळून उपाययोजना करायला पाहिजे.”

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, एक माणूस जमिनीत खोलवर गाडलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी एक महिला आणि एक मुलगी दिसत आहे. त्याचे केवळ डोके जमिनीच्या वर दिसत आहे. आणि ते लोक रील काढत आहे. ती महिला त्या पुरुषाला खायला घालत आहे. परंतु हा असा धोकादायक प्रकार त्याच्या जीवावर देखील बेतू शकला असता. या गोष्टीचे कोणालाही भान राहिले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.