Viral Video – ‘समुद्र माझ्या पुण्यात नाही…’; रसिकांकडून Once More मिळालेल्या कवितेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजपर्यंत तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी फूड फ्युजन, कधी मेकअप, साडी ड्रेपिंग अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश असतो. अनेकदा कॉमेडी रिल्स किंवा एखाद्या चित्रपटातील गाण्याच्या हुक्स्टेप्स, डायलॉगबाजीचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. पण हा व्हिडीओ इतर व्हिडिओंपेक्षा जरा वेगळा आहे. मजेशीर आहे पण बऱ्याच जणांच्या काळजाला हात घालणारा आहे. आजपासून व्हेलेंटाईन वीक सुरु झाला आहे. त्यामुळे प्रेमी युगलांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळतोय. अशातच हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Viral Video) ज्यामध्ये सोहळा पुस्तकांचा या कार्यक्रमातील एक विशेष क्षण टिपण्यात आला आहे. मंचावर उपस्थित कवी मित्राने एक फक्कड अशी कविता सादर करत प्रेमाला हुकलेल्या तरुण प्रेमवीरांना पुरता दिलासा दिला आहे. हि कविता पुढीलप्रमाणे आहे,
समुद्र माझ्या पुण्यात नाही हरकत नाही
समुद्र माझ्या पुण्यात नाही हरकत नाही
हिच्या मिठीला तिचा शहारा हवा कशाला??
मनात इतका जुना पसारा हवा कशाला??

Viral Video कवीने या चार ओळी पूर्ण करताच वन्स मोरची गुंज उठते आणि पुन्हा एकदा कविवर्य म्हणतात कि,
समुद्र माझ्या पुण्यात नाही हरकत नाही
पुण्यात खारट असा किनारा हवा कशाला??
मला बिचारा म्हणून गेलीस ना गं तेव्हा??
पुन्हा तुला मग असा बिचारा हवा कशाला??

कवीने आपली कविता पूर्ण करताच संपूर्ण सभागृह टाळ्या, शिट्ट्या आणि हास्याने गडगडून उठताना या व्हिडिओत पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर jayesh_pawarofficial नावाच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तुमच्या पुणेकर मित्रांना टॅग/शेअर करा.. शेवटच्या दोन ओळी सुद्धा लक्षपूर्वक ऐका… आणि ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुम्हाला सोडले त्यांच्याशी शेअर करा… (असा बिचारा हवा कशाला?)’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस करत म्हटलंय कि, ‘म्हणूनच पुणेकरांच प्रेम ‘अळणी’ असत’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘कविता चांगली आहे पण पुणेकर मुंबईकरांची बरोबरी करूच शकत नाहीत’. अन्य एकाने म्हटले, ‘असला खारट किनारा जरी लाट गोड असते म्हणून असतो समुद्र जिथे त्याला तोड नसते’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘एकदम तुफान शेवटचा शेर. वन्स मोअर आला तो योग्यच!!’ या व्हिडीओने ऐन व्हेलेंटाईनच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर व्यापून टाकला आहे.