Viral Video | सावधान ! नवीन टायरच्या नावाखाली जुने तयार देऊन अशी करतात फसवणूक, पहा व्हिडिओ

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | आपण आपल्या बाईकची आणि कारची नेहमीच काळजी घेत असतो. वेळोवेळी सर्विसिंग करणे, वॉशिंग करणे त्याचप्रमाणे टायर बदलणे या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. आपल्या गाड्यांचे टायर जुने झाल्यावर ते वेळोवेळी बदलणे देखील खूप गरजेचे असते. कारण हे जुने आणि गुळगुळीत झालेले टायर अत्यंत धोकादायक असतात. त्यामुळे गाडीचे टायर जुने झाल्यावर आपण दुकानात जाऊन नवीन टायर विकत घेऊन गाडीला बसवतो.

परंतु आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो आणि टायर बदलतो, त्यावेळी आजकाल ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. ती म्हणजे दुकानदार हे जुने टायर नवीन करून पुन्हा गाडीला बसवत आहे. जे सामान्यपणे आपल्याला लगेच कळून येत नाही. परंतु त्यामुळे पुढे जाऊन खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण हे टायर अपघातात कारणीभूत ठरतात.

जुन्या टायरला अशा पद्धतीने नवीन करतात | Viral Video

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. ज्या वायरल व्हिडिओमध्ये टाकाऊ टायरला नवीन केलेले दाखवले आहे. हे कशा पद्धतीने करतात त्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्यांनी खराब टायरला खाचे पडून नवीन केले आहे आणि त्याला काळया रंगाचे पॉलिश देखील केलेले आहे. शेवटी टायरला नवीन रॅपिंग केली आहे. या टायरला रॅपिंग केल्यानंतर आपल्यालाच जुना टायर कोणता हे ओळखता येते कठीण आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, “अधिकृत डीलर्सकडून नवीन टायर खरेदी करा पैसे वाचवण्याच्या प्रयत्न तुम्ही तुमचा जीवही गमावू शकता.” अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण टायर घेताना चांगल्या कंपनीचे घेणे आणि चांगल्या दुकानातून घेणे खूप गरजेचे आहे. लोकल मार्केटमधून जर आपण टायर खरेदी केले तर आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आणि ही फसवणूक पुढे जाऊन आपल्या जीवावर देखील बेतू शकते.